गांधी हा काहींच्या टवाळीचा विषय असतो. आपण सर्वज्ञ आहोत अशी समजूत करून घेतली की, हे ओघाने येतेच.
विसाव्या शतकाने भारताला महत्त्वाचे तीन सुपुत्र दिले. पैकी एक म. गांधी, दुसरे पं. नेहरू आणि तिसरे डॉ. आंबेडकर. पहिल्याने भारतीय जनतेला राजकीय जाणीव देऊन तिला स्वतंत्र केले. दुसऱ्याने स्वतंत्र भारताचा सामाजिक, राजकीय आणि आर्थिक पाया मजबूत केला. आणि तिसऱ्याने भारताचे भवितव्य संविधानाची निर्मिती करून वचनबद्ध केले. मात्र द्वेषमूलक प्रचार करून त्यांना इतिहासातून अदृश्य करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसते.......